मधुमेह प्रकार २ ची लक्षणे व त्यांची कारणे - Top Diabetologist in Navi Mumbai - Sweet Clinics

मधुमेह प्रकार १ मध्ये दिलेली सर्व लक्षणे मधुमेह प्रकार २ मध्ये होऊ शकतात. तथापि मधुमेह प्रकार २ मध्ये साधारणपणे ही लक्षणे हळूहळू सुरू होतात आणि सौम्य असतात. या प्रकारात उपचार न झाल्यास मृत्यू सहसा लगेच येत नाही.

काही लक्षणे आणि त्यांची कारणे पुढीलप्रमाणे:
• धुरकट दिसणे, उपनेत्रांचा क्रमांक वरचेवर बदलावा लागणे - अतिरिक्त रक्तग्लुकोजमुळे डोळ्यांतील भिंगांच्या पेशींमधील पाण्याचे रक्तात वहन
• संक्रमण - कमी प्रतिकारशक्तीमुळे विशेषकरून मूत्रमार्ग (लघवीला जळजळ, लघवी करण्याची वारंवार भावना, गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त लघवी, ताप), गुह्यभाग/त्वचा (विविध भागांना वारंवार गळू होणे, स्त्रियांमध्ये गुह्य भागाला खाज सुटणे, भगोष्टांना सूज येणे, भगोष्ट व त्याच्या सभोवतीचा भाग लाल होणे; पुरुषांमध्ये शिस्नाच्या पुढील भागावरील कातडी सुजणे व लाल होणे, तिला भेगा पडणे) आणि श्वसनमार्ग (वारंवार घसा दुखणे किंवा खवखवणे, खोकला, ताप) यांची संक्रमणे.नवी मुंबईतील टॉप डायबेटोलॉजिस्ट
• जखमा भरून न येणे - कमी प्रतिकारशक्ती आणि शरीराच्या विविध भागांतील रक्तपुरवठ्यात बदल
• मधुमेहाच्या उपद्रवांमुळे लक्षणे - तळपायांची आग, पोटऱ्यांत पेटके, पाय दुखणे, दृष्टिदोष, समागम करण्याची अनिच्छा किंवा असमर्थता
• मधुमेह किंवा अन्य विकारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचे अवांच्छित परिणाम

Comments

Popular posts from this blog

Everything You Should Know About Diabetes and Blurry Vision

How to Avoid Losing Foot (Amputation) in Diabetes Foot..?

Other Diseases That Are More Common in People With Type 1 Diabetes - Sweet Clinics